अचेतन कर्म सचेतन ब्र
536.
अचेतन कर्म सचेतन ब्रह्म ।
वोळखीजे धर्म दोहींचाही ॥१॥
मग तो ब्राह्मण बोलिजे निश्चित ।
सावधान चित्त सर्वकाळ ॥२॥
मन बुद्धि चित्त अहंकार सर्व ।
वोळखोनी पूर्व कर्म करी ॥३॥
बहेणि म्हणे कर्म-कर्तव्य वोळखे ।
ब्राह्मण विवेके वोळखीजे ॥४॥
