सुरकांडी - अभंग १९७
197.
सुरकांडी - अभंग १९७
घेऊनियां हाती काठी । पोरा खेळसी सुरकांडी रे ॥१॥
खेळे सुरकांडी पोरा खेळे सुरकांडी । विषयांची वासना धरुनी चढसी प्रपंचाचे झांडी ॥२॥
बुडापासुन शेंडा रे चढसी फांडोफादी रे । कामक्रोध पोरे लागती पाठींम्हणती माझा दादा रे ॥३॥
धरी एका जनार्दनी गोडी तरी खेळ जोडा रे । वाया खेळ खेळू जाती होईल भ्रकवडी रे ॥४॥
