सांवळीये बुंथी सांवळ
882.
सांवळीये बुंथी सांवळिया रूपे ।
सांवळिया स्वरूपे वेधियेले ॥१॥
काय करूंगे माये सांवळे न सोडी ।
इंद्रिया इंद्रिय जोडी एकतत्त्वे ॥२॥
कैसे याचे तेज सांवळे अरूवार ।
कृष्णी कृष्ण नीर सतेजपणे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचे खुणे ।
सांवळेंची होणे यासी ध्याता ॥४॥
अर्थ :
शामवर्ण खोळीत शामवर्णरूपाने असलेल्या परमात्म्याने त्या सांवळ्या स्वरूपाचे मला वेडच लावले. काय करावे, हे रूप माझ्या डोळ्यांत भरून गेले. ते मला सोडावेसे वाटत नाही. त्याच्या योगाने इंद्रिय एकरूप झाली. काय या शामसुंदर कृष्णाचे तेज सांगावे. ते नीलवणनि त्याच्याठिकाणी शोभते. निवृत्तीनाथांच्या उपदेशाने याचे ध्यान करू गेले असता आपणही सांवळे रूप होऊन जावू असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
