निरंजन वना गेलिये सा
883.
निरंजन वना गेलिये साजणी ।
तेथे निर्गुणे माझ्या मनी वेधियेले ॥१॥
सुखाची अति प्रीति जहाली गे ब्रह्मी ।
श्रीगुरूनिवृत्ति मुनी जाहले गे माय ॥२॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु सहज सांवळा ।
निर्गुण दाविला विसुरा गे माये ॥३
अर्थ :
मी निरंजन वनामध्ये गेलें. तो तेथे त्या निर्गुणाने माझे मन वेधून टाकले. त्या परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाच्या ठिकाणी फार प्रेम जडले आणि तो परमात्मा श्रीगुरू निवृत्तीमुनी, मीच होऊन बसले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तो मला सहज प्राप्त झाला. आणि चमत्कार काय सांगावा तो निर्गुण मला दाखविले असे माऊली सांगतात.
