वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ७, विरहिणी अभंग ८७६ ते ९१३

सांवळे परब्रह्म आवडे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074663 · अभंग क्र. ८८१

881.
सांवळे परब्रह्म आवडे या जिवा ।
मने मन राणिवा घर केले ॥१॥
काय करू सये सांवळे गोंवित ।
आपेंआप लपत मन तेथे ॥२॥
बापरखुमादेविवरू सांवळी प्रतीमा ।
मने मनी क्षमा एक झाले ॥३॥

अर्थ :
अति मोहक, शामसुंदर, परब्रह्म भगवान श्रीकृष्ण तो या जीवाला फार आवडतो. म्हणूनच मने मन म्हणजे आपल्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मसौख्य भोगण्यांस राजमंदिर केले. काय करावे ते सांवळे परब्रह्म माझ्या मनाला आपल्यांत अटकवून टांकते. म्हणजे मन सहजच तेथे लपून जाते म्हणजे एकरूप होते. माझे पिता व रखुमादेवीचा पती सांवळ्या प्रभेचा जो श्रीविठ्ठल त्याचेच ठिकाणी जाण्याचा मनाचा प्रवाह झाला आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग