तुम्ही जावे निजमंदिर
4009.
तुम्ही जावे निजमंदिरा । आम्ही जातो आपुल्या घरा ॥१॥
विठोबा लोभ असो देई । आम्ही असो तुमचे पाई ॥धृपद॥
चित्त करी सेवा । आम्ही जातो आपुल्या गावा ॥२॥
तुका म्हणे दिशा भुललो । फिरोन पायापाशी आलो ॥३॥
अर्थ :
देवा तुम्ही तुमच्या शयनगृहामध्ये जा व आम्ही आमच्या घरी जातो. हे विठोबा तुला आमच्या विषयी नेहमी लोभ म्हणजे प्रेम राहू दयावे आम्ही तुमच्या पायाजवळ नेहमी असू. देवा आम्ही आमच्या गावाला जातो परंतु आमचे चित्त नेहमी तुमचीच सेवाच करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी दिशा भुललो आहे आणि फिरुन पुन्हा तुमच्याच पायापाशी आलो आहे.
