पाहे प्रसादाची वाट ।
4010.
पाहे प्रसादाची वाट । द्यावे धोवोनिया ताट ॥१॥
शेष घेउनि जाईन । तुमचे जालिया भोजन ॥धृपद॥
जालो एकसवा । तुम्हा आडुनिया देवा ॥२॥
तुका म्हणे चित्त । करूनि राहिलो निश्चिंत ॥३॥
अर्थ :
देवा मी तुमच्या प्रसादाची वाट पाहात आहे ज्या ताटामध्ये तुम्ही भोजन केले ते ताट धुवून ते तीर्थ मला प्रसाद म्हणून दयावे. तुमचे भोजन झाले की, तुमचे शेष मी घेऊन जाईन. देवा मला आता शेष भाग मिळाला आहे त्यामुळे मी तुमच्या समोरुन बाजूला झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझे चित्त अगदी निश्चिंत करुन राहिलो आहे.
