कान्होबाचे चाटुनिया
218.
कान्होबाचे चाटुनिया आंग ।
म्हणती मग पोट धाले ॥१॥
रोज ऐसिची देंई धणी ।
लागती चरणी गोपाळ ॥२॥
म्हणती गोविंद मोठे व्हाल ।
मग तुम्ही जाणे सांडाल सोंय माझी ॥३॥
निळा म्हणे ते वाहती आण ।
नेणो सुजाण तुजविण ॥४॥
218.
कान्होबाचे चाटुनिया आंग ।
म्हणती मग पोट धाले ॥१॥
रोज ऐसिची देंई धणी ।
लागती चरणी गोपाळ ॥२॥
म्हणती गोविंद मोठे व्हाल ।
मग तुम्ही जाणे सांडाल सोंय माझी ॥३॥
निळा म्हणे ते वाहती आण ।
नेणो सुजाण तुजविण ॥४॥