कावडी भरुनि आणिली क्
217.
कावडी भरुनि आणिली क्षीरे ।
दही घृत सारे नवनीते ॥१॥
आदनाचेही पर्वत आले ।
माजि ते केले मिश्रित ॥२॥
भोवते गोपाळ मध्ये हरी ।
दाविती कुसरी नृत्याची ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हानंदु ।
लोटला सिंधु क्षीराचा ॥४॥
217.
कावडी भरुनि आणिली क्षीरे ।
दही घृत सारे नवनीते ॥१॥
आदनाचेही पर्वत आले ।
माजि ते केले मिश्रित ॥२॥
भोवते गोपाळ मध्ये हरी ।
दाविती कुसरी नृत्याची ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हानंदु ।
लोटला सिंधु क्षीराचा ॥४॥