निंदक भेतता दुणावे ह
390.
निंदक भेतता दुणावे हारिख ।
भक्ताही विशेष सुख वाटे ॥१॥
निंदक सांगाती येणेपरी बापा ।
करिती निष्पापा गुरूभक्ता ॥२॥
सुवर्णाचा मळ काढिताचि पुटी ।
पडियेली तुटी हीणा जेवी ॥३॥
आरसा उजाळ करिताती देख ।
मळ तो निःशेष जाय जेवी ॥४॥
निंदके निंदिता कर्ताकर्म जळे ।
आम्हासि आकळे परब्रह्म ॥५॥
बहेणि म्हणे निंदक देखे जेव्हा डोळा ।
आनंद सोहळा करितसे ॥६॥
