हरिभक्त तेचि जाणावे
389.
हरिभक्त तेचि जाणावे पा तुम्ही ।
जे का भागवतधर्मी विधियुक्त ॥१॥
वेदविधिमार्गा नुल्लंघिती सर्वथा ।
अखंड हे आस्था भूतमात्री ॥२॥
कर्म वोसंतिती देहाचेनि छंदे ।
अखंड आनंदे क्रीडताती ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे जिवलग ते माझे ।
भेटता सहजे सुख होय ॥४॥
