वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

हरिभक्त निंदक जन्मले

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076256 · अभंग क्र. ३९१

391.
हरिभक्त निंदक जन्मले एके ठायी ।
वाटा तया पाही भागा आला ॥१॥
ज्याचे कर्म त्याने केलेचि पाहिजे ।
न करिता सहजे दोष होती ॥२॥
म्हणोनि निंदके निंदाचि करावी ।
तयासी तोचि जीवी आठो असे ॥३॥
हरिभक्ते भजन करावे आदरे ।
संतांची सादरे पूजा कीजे ॥४॥
कावळ्याचा धर्म टोचावे ढोपरा ।
मौक्तिकाचा चारा काय त्यासी ॥५॥
श्वानाचा स्वभाव गुरगुर करावी ।
पिसाळल्या जीवी प्राण घ्यावा ॥६॥
हंसाचा स्वभाव पय-पाणी निवडी ।
विष्ठा तो चिवडी काय घडे ॥७॥
बहेणि म्हणे तैसे ज्याचे कर्म तेणे ।
करावे म्हणणे न लगे तया ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग