वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ऊठ सत्वर विठ्ठला ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076415 · अभंग क्र. ६५१

651.
ऊठ सत्वर विठ्ठला ।
भेट देई रे आम्हाला ।
वाट पाहाती सकळा ।
सखिया तटस्थ नयनी ॥१॥
वाटसी नयनी पाहावा ।
जन्मोजन्मी विठ्ठल व्हावा ।
म्हणोनि वाट पाहाती भावा ।
भेटी दे रे विठ्ठला ॥२॥
नयना आस थोर आहे ।
कै भेटेल विठ्ठल माये ।
काया बहु इच्छित पाहे ।
क्षेम दे रे झडकरी ॥३॥
हात ठेवोनिया कटी ।
कै हा देखेन विठ्ठल दिठी ।
डोळेभरी जगजेठी ।
हृदय-पेटी सांठवीन ॥४॥
विठ्ठल जपता मानसी । अपूर्ण )

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग