वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(डाकाचरूपक)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079895 · अभंग क्र. ३९१४

3914.
(डाकाचरूपक)
माझा देव्हारा साचा । नाही आणीक कोणाचा । त्रिभुवनी याचा । ठसा न लगे पुसावे ॥१॥
या रे लोटांगणी । काही करा विनवणी । करील झाडणी । भूत काढील संसार ॥धृपद॥
पडिले विषयांचे गोंधळी । ते त्रिगुण आकळी । हरीनाम आरोळी । कानी पडता ते उठी ॥२॥
घेतला अहंकारे । काम क्रोध या मत्सरे । पळती प्रेमभरे । अवघे ठाव सांडुनी ॥३॥
घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनी ॥४॥
तुका म्हणे द्यावा भाव । फिटेल मनिचा संदेह । आणीक न लगे ठाव । काही कोठे हिंडावे ॥५॥

अर्थ :
माझा देव्हारा खरा आहे आणि माझ्या देव्हा-यासारखा देव्हाराही कोणाचा नाही माझ्या दैवताचा ठसा त्रैलोक्यात पसरलेला आहे त्यामुळे माझ्या देव्हा-यामध्ये कोणता देव आहे हे पुसणेच नको. त्यामुळे तुम्ही लोटांगण घालीत माझ्या देवापुढे या आणि त्याला काहीतरी विनवणी करा. तो तुमच्या सर्व दु:खाची झाडणी करील आणि तुमच्या अंगामध्ये जे संसाररुपी भूत आहे ते देखील तो बाहेर काढील. विविध विषयांमध्ये जे पडलेले असतात विषयांच्या गोंधळांमुळे ते लोक त्रिगुणात गुंतून पडतात. हरीनामाची आरोळी एकदा कानावर पडली की, ते त्रिगुण उठून जातात. अहंकार, काम, क्रोध, मत्सर यांनी तुम्हाला घेरले आहे. प्रेमाने हरीचे नाम घ्या मग हे सर्व विकार तुम्हाला सोडून पळून जातील तुमच्या ठिकाणी हे विकारच राहणार नाही. माया, ममता, आसरा यांनी ज्यांना त्रास दिला आहे, ते सर्व माझ्या किर्तनाचा रंग पाहून एकदमच पळून जातील. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या दैवताला तुम्ही तुमचा एकनिष्ठ भक्तिभाव अर्पण करा मग तुमचा सर्व संदेह नाहीसा होईल. मग इतर

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग