वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(डाकाचे रूपक)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079658 · अभंग क्र. ३९१५

3915.
(डाकाचे रूपक)
पुढे येते देवी । तिची जती चालो द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥१॥
एकवीरा आली अंगा । आता निवारील रोगा । माझ्या भक्तापाशी सांगा । पूजा भावे करावी ॥धृपद॥
मेंढा मारावा लोहाळ । पूजा पावली सकळ । तुम्ही केले बळ । मग मी ठायी न पडे ॥२॥
तुका म्हणे मुळी । लागली ते आली कुळी । वंदुनी सकळी । जीवे भावो ओवाळा ॥३॥

अर्थ :
देवीची बारी सतत चालू ठेवावी म्हणजे देवी पुढे येते. मागे तुम्ही या देवीपुढे जे काही नवस बोलले आहेत ते सर्व तुम्ही पूर्ण करा नाहीतर ही देवी तुमच्या आयुष्यरुपी मायेला हिसका देईन. आता माझ्या अंगामध्ये एकवीरा संचरली आहे माझ्या सर्व रोगाचे निवारण ती करेन. ती म्हणते आहे की, माझ्या भक्तांना सांग माझी पूजा मनोभावे करावी. मनरुपी पुष्कळ केस असलेला मेंढा माझ्यापुढे मारावा तरच मला पूजा प्राप्त होईल. नाही तर तुम्ही कितीही वेळा प्रयत्न केले तरीपण मी तुम्हाला कुठेच सापडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मूळत:च जी देवी माझ्या कुळामध्ये आली आहे. या देवीला वंदन करुन सर्वांनी जीवाभावाने ओवाळा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग