वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गौळणीबाळ देखियला डोळ

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076413 · अभंग क्र. ४२२

422.
गौळणीबाळ देखियला डोळा ।
गोविंद सावळा बाइयांनो ॥१॥
वेधलीसे वृत्ति लागली हे स्थिति ।
गोरस हा चित्ती विसरल्या ॥२॥
माझा हरि घ्यावो ।
अंतरीचा भावो पालटला ॥३॥
शरीरभावाच्या पडिल्या विसरी ।
गोरसासी हरी म्हणताती ॥४॥
हरीच्या ह्या कैशा पडियेल्या छंदी ।
हिंडती बिदोबिदी बाजारेसी ॥५॥
बहेणि म्हणे जया गारसाची भूक ।
तयासी हरीचे सुख काय कळे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग