वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गौळणी-रंगणी परब्रह्म

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075982 · अभंग क्र. ४२१

421.
गौळणी-रंगणी परब्रह्म खेळतो ।
गोमयी रूळतो बाळकृष्ण ॥१॥
क्षीरसागरीचे सुख सांडोनी परते ।
अनुसरला येथे भक्तीलागी ॥२॥
नवल हे आवडी न कळे निजवर्म ।
वेडावले ब्रह्म भक्तीलागी ॥३॥
अश्वमेधादिक यज्ञाचे आहुते ।
न पाहे तयाचे आळुमाळ ॥४॥
तो हा गोपाळा-करीचे उच्छिष्ट ।
अन्न खावया लागून वाट पाहे ॥५॥
वेद श्रुती वर्णिता न घेचि पै चित्ती ।
श्रमलिया म्हणती नेति नेति ॥६॥
बहेणि म्हणे फुका सापडला हरी ।
प्रेमसूत्रदोरी गळा लावू ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग