वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

देहघट लवंडोन रिता के

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075913 · अभंग क्र. ४२३

423.
देहघट लवंडोन रिता केला ।
निजज्ञाने पाणीया भरिन्नला ॥१॥
कैसी चाले ठुमकत जो हे बाळा ।
अंतरीची वेगळी प्रेमकळा ॥२॥
ज्ञानगंगे-यमुने भरी पाणी ।
ऊर्ध्वदृष्टी लक्षी त्या चक्रपाणी ॥३॥
सोहं दुडी वाहोनी चाले थीर ।
मी-तूपण मोकळे चारी पदर ॥४॥
सुखे स्वरूपी लागली निजगोडी ।
तेणे घराचा अहंकारारांजण फोडी ॥५॥
सारोनिया वाच्यांश-खडा थोर ।
लक्षुनिया सुक्षण हाणे वर ॥६॥
तेणे मिसे ते जूट जाली नारी ।
मग बोले वरिवरी लोकाचारी ॥७॥
ऐशा करिता मुकली येरझार ।
मग देव मांडीली संगिकार ॥८॥
बहेणि म्हणे लाधले सुखे सुख ।
जैसे जीवनी लवण समरस ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग