जुनाट जुगादीचें नाणे
662.
जुनाट जुगादीचें नाणें । बहु काळांचे ठेवणें ।
पुंडलिकांचे पायाळपणें । उभे ठेले विटेवरी ॥१॥
युगे जाहलीं अठ्ठवीस । वास भीवरेतीरास ।
भक्तांची धरु आस । विटे उभा राहिला ॥२॥
एका जनार्दनी भाव । तया भेटतसे देव ।
अभागीये भेव । सदा वसे अंतरी ॥३॥
