जाणोनिया यम संतोषला
31.
जाणोनिया यम संतोषला मनी । मंजुळ वचनी काय बोले ॥१॥
केली देवे कृपा पाठविले मज । वरदान तुज द्यावयासी ॥२॥
सर्वही जीवाचा नियंता मी यम । इच्छिसी तो काम पूर्ण करू ॥३॥
शिवरात्री आजी उपवास केला । शंकर तोशला बिल्वदळी ॥४॥
नामा ह्मणे ऐसे ऐकता वचन । पार-ध्याचे मन सुखावले ॥५॥
