वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

ध्येय ध्याता हे दोन्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074860 · अभंग क्र. २०३

203.
ध्येय ध्याता हे दोन्ही नाही ।
तेथे ज्ञेय ज्ञाता उरे काई ।
अरे मना परापर परते पाही ।
ते तू स्वंये आपण पाही रे मना ॥
रखुमादेविवरा विठ्ठलाची आण ।
जरी बुझसी तरी तूचि निर्वाण ॥

अर्थ :
श्री गुरुकृपेने ध्येय ध्याता हे नाहीसे झाले. त्याच बरोबर ज्ञेय ज्ञाता हेही उरले नाही. अरे मना पर श्रेष्ठ व कनिष्ठ जो जीवभाव याच्याही पलीकडे असणारे जे परमतत्व ते आपण स्वतःच आहोत असे मनाला सांग. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांची शपथ घेऊन सांगतो. परमात्मस्वरूपांची ऐक्य समजले तरच मोक्ष मिळतो असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग