आजी लाजले तुमच्या पा
202.
आजी लाजले तुमच्या पायी स्तुती करू काई ।
तुम्हा पाही विनवितसे ॥
निवृत्ति बाप निवृत्ति माये ।
निवृत्ति पाहे विवळलिये ॥
देखणे देखिले तेचि होई पा रे मना ।
निवृत्तिचरणी स्थिर राही पा रे ज्ञाना ॥
अर्थ :
आज तुमच्या पायाची प्राप्ती झाल्यामुळे त्या भिडेमुळे आता स्तुती काय करावी निवृत्तिनाथ माझे मायबाप आहेत अशा रितीने निवृत्तिनाथ माझ्या हृदयी स्थापित आहेत. हे मना जाणोन घेण्याला अवश्य असे ते श्री गुरु आहेत. अरे ज्ञाना, तु निवृत्तिच्या चरणी स्थीर हो असे माऊली सांगतात.
