सुख आपले आपण तो पाहे
204.
सुख आपले आपण तो पाहे ।
रूप आपुले आपण ध्यार रे मना ॥
लक्ष निवृत्तिचरणी धीरू राहे ।
भेदुभ्रम सांडी सावध होये ॥
बापरखुमादेविवरू एकचि पुरे ।
जाणतील या सर्व सुख मोहरे ॥
अर्थ :
अरे मना आपले आत्मसुख व आत्मरुप पाहा. ह्या मध्येच तुला सर्व सुख मिळेल. श्रीगुरू निवृत्तीच्या चरणाच्या ठिकाणी धीर धरून राहा. भेदभ्रम टाकून दे आणि सावध हो. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांचचे चिंतन कर त्यास जाणले असता तोच सर्व सुखाचे माहेर घर आहे असे माऊली सांगतात.
