वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

कर्माआदि अंती मध्ये

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076021 · अभंग क्र. ५३५

535.
कर्माआदि अंती मध्ये ब्रह्मभाव ।
जाणे तो अनुभव ज्ञानियाचा ॥१॥
ऐसिया स्थितीचे ब्राह्मण ते खरे ।
येर ते पामरे वोळखावे ॥२॥
ॐकारे आदरी तत्कारे समर्पी ।
सत्कारे स्वरूपी ऐक्य करी ॥३॥
बहेणि म्हणे तेही ब्रह्मची निभ्रांत ।
अनुभवोनी तथ्य लीन होय ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग