वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पिंड ब्रह्मांडासी कर

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076409 · अभंग क्र. १०३

103.
पिंड ब्रह्मांडासी करूनी ऐक्यता ।
होय या परता साक्षीरूप ॥१॥
सर्व तूचि होसी सर्वाही वेगळा ।
ऐसी साध कळा सद्गुरूमुखे ॥२॥
हिंग-हिरण्यासी ऐक्य करूनिया ।
जाय तू अद्वया ब्रह्मपदा ॥३॥
आशा तृष्णा माया एकरूप दोनी ।
करोनिया जनी वर्ते सुखे ॥४॥
सर्वही प्रपंच ऐकतेसी आणी ।
तूचि जनी वनी होउनी राहे ॥५॥
बहेणि म्हणे सर्व हारपली मुळी ।
ते रूप न्याहळी ज्ञानदृष्टी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग