प्रारब्धाआधीन शरीर ल
104.
प्रारब्धाआधीन शरीर लागले ।
आत्मत्व निराळे वेगळेचि ॥१॥
सुखदुःख हे याचे नाणावे अंतरी ।
पूर्ण साक्षात्कारी स्थिर राहे ॥२॥
केले ते भोगील आपुले आपण ।
होय उदासीन सर्वभावे ॥३॥
बहेणि म्हणे त्याचे सांगेन विंदान ।
सद्गुरूचरण साधी पा रे ॥४॥
