(पांगुळ)
3919.
(पांगुळ)
पागुळ झालो देवा नाही हात ना पाय । बैसलो जयावरी सैराट ते जाय ।
खेटिता कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाही मज कोणी । बाप ना माय ॥१॥
दाते हो दान करा । जाते पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अखमाचा सोयरा ॥धृपद॥
हिंडता गव्हाने गा । शिणलो येरझारी । न मिळेचि दाता कोणी । जन्मदुःख निवारी ।
कीर्ति हे संता मुखी । तोचि दाखवा हरी । पागळा पाय देतो । नांदे पंढरपुरी ॥२॥
या पोटाकारणे गा । झालो पागीला जना । न सरेचि बापमाय । भीक नाही खंडणा ।
पुढारा म्हणती एक । तया नाही करुणा । श्वान हे लागे पाठी । आशा बहु दारुणा ॥३॥
काय मी चुकलो गा । मागे नेणवेचि काही । न कळेचि पाप पुण्य । तेथे आठव नाही ।
मी माजी भुललो गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव काही ॥४॥
दुरोनि आलो मी गा । दुःख झाले दारुण । यावया येथवरी होते । हेचि कारण ।
दुर्लभ भेटी तुम्हा । पायी झाले दरुषन । विनवितो तुका संता । दोन्ही कर जोडून ॥५॥
अर्थ :
देवा मी परमार्थ करण्यासाठी पागूळ झालो आहे कारण माझ्याकडे विवेक नावाचे हात आणि वैराग्य नावाचे पाय नाहीत ज्या मनावर माझा विश्वास होता ते मन तर कोठेही सैराटवाणी धावत आहे. देवा हे माझे मन विविध प्रकारच्या विषयरुपी कुंपनातल्या काट्यांना, खुंटांना खेटत आहे नरकरूपी दरड देखील हे पाहात नाही अशा अवस्थेमध्ये मला कोणाचाही आधार नाही व परमार्थ करण्यात मला बापही व मायही अनुकूल नाही. त्यामुळे हे संतजन हो तुम्ही पंढरपुरला चालले आहात तर मला तिथपर्यंत नेण्याचे दान करा मला पंढरपूरपर्यंत घेऊन जा मला तेथे न्या कारण तुम्ही अक्षम म्हणजे पंग
