वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 109. गुरूंची बुडालेल्या पुत्राची मागणी व पांचजन्य वध

गुरूंची बुडालेल्या प

🙏 4. संत नामदेव · ABH-083173 · अभंग क्र. १९७

197.
गुरूंची बुडालेल्या पुत्राची मागणी व पंचजन्य वध

समुद्रांत पुत्र बुडाला रे माझा । पराक्रम तुझा ठावा असे ॥१॥
अवश्य म्हणोनी तेथोनी निघाले । समुद्रांत आले राम-कृष्ण ॥२॥
करोनिया पूजा पुसे वर्तमान । देईंरे आणून गुरुपुत्र ॥३॥
पांचजन्य दैत्य येथे बळी राहे । बंधु तेथे पाहे कृष्णनाथा ॥४॥
टाकोनिया उडी वधिले तयासी । पाहे ह्लषिकेशी उदरांत ॥५॥
नाही ऐसे कळो आले ते ईश्वरा । घेवोनी शरीरा आला ॥६॥
परीक्षिती काय न कळे तयाला । दावीतसे लीला नामा म्हणे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग