अक्रुराचा धृतराष्ट्र
209.
अक्रुराचा धृतराष्ट्रास उपदेश
अवश्य म्हणोनि चालिला अक्रूर । पाहियेले पूर कौर-वांचे ॥१॥
धृतराष्ट्रा सांगे विवेकाच्या गोष्टी । फार तुझ्या पोटी दुष्टबुद्धी ॥२॥
बंधूचिया पुत्रा धरितोसी दूर । होसी लोमापर पुत्रांवरी ॥३॥
करितोसी द्वेष पंडूच्या पुत्रांचा । होशील नरकाचा अधिकारी ॥४॥
स्वर्गींचे पूर्वज हांसतील तुज । धरावा उमज ग्रेथोनिया ॥५॥
सांगोनिया ऐसे येथूनि उठला । कुंतीसी भेटला नामा म्हणे ॥६॥
