ज्ञानेश्वर म्हणे नाम
287.
ज्ञानेश्वर म्हणे नाम्यासवे जेविसी । नाही ह्रुषिकेशी म्हणतसे ॥1॥
सांगितले एक भलतेचि बोलसी । आहे याची भ्रांति ज्ञानेश्वरा ॥2॥
बाहियेले त्वरे ऐसे काही काम । उठे मेघः- शाम तातडीने ॥3॥
निरोप येवोनि सांगावा एकांती । म्हणे जनीप्रति पांडुरंग ॥4॥
देव म्हणे नाम्या ऐकावे वचन । येईल साधोन वेळ तुझी ॥5॥
जनी म्हणे आता समजले मज । धरीन उमज येथोनिया ॥6॥
