वारा पाणी मुसळ धारा
286.
वारा पाणी मुसळ धारा । तेणे मोडिले छपरा ॥1॥
मग विठाई धावली । हाती चक्र धावत आली ॥2॥
वासे लाविले चौफेर । क्षणामध्ये केले घर ॥3॥
जागा झाला नामदेव । द्वारी उभे पंढरिराव ॥4॥
डोयी ठेवून पायांवरी । दासी जनी चरण चुरी ॥5॥