मूर्ति अनुपम्य विटेव
437.
मूर्ति अनुपम्य विटेवरी साजिरी । पाउले गोजिरे कोविळीं ती ॥१॥
तेथे माझे मन वेडावले भारी । परत माघारी परतेना ॥२॥
वेधलासेंअ जीव सुखा नाही पार । माहेर माहेर पंढरी देखा ॥३॥
एका जनार्दनी सुखाची वसती । भाविकां विश्रांती पंढरीरावा ॥४॥
