उगाचि वदविता का गा ।
647.
उगाचि वदविता का गा ।
वाचा माझी पांडुरंगा ॥१॥
कोणा न रुचे ऐकता ।
हांसो लागती तत्वता ॥२॥
म्हणती रचिले हे पाखांड ।
सैरा वाजविले तोंड ॥३॥
निळा म्हणे आता ठेवा ।
दिला दयोकार तो हा देवा ॥४॥
647.
उगाचि वदविता का गा ।
वाचा माझी पांडुरंगा ॥१॥
कोणा न रुचे ऐकता ।
हांसो लागती तत्वता ॥२॥
म्हणती रचिले हे पाखांड ।
सैरा वाजविले तोंड ॥३॥
निळा म्हणे आता ठेवा ।
दिला दयोकार तो हा देवा ॥४॥