इतर साधनी उपाव ।
646.
इतर साधनी उपाव ।
करिती ते ते आम्हा देव ॥१॥
काय जाणितले तिही ।
पडिले साधनांचे वाही ॥२॥
कोण लाभ कैसी गती ।
काय पावती ते अंती ॥३॥
निळा म्हणे नेणो आम्ही ।
तुमच्या नामेविण स्वामी ॥४॥
646.
इतर साधनी उपाव ।
करिती ते ते आम्हा देव ॥१॥
काय जाणितले तिही ।
पडिले साधनांचे वाही ॥२॥
कोण लाभ कैसी गती ।
काय पावती ते अंती ॥३॥
निळा म्हणे नेणो आम्ही ।
तुमच्या नामेविण स्वामी ॥४॥