मी तो नेणे व्यासवाणी
167.
मी तो नेणे व्यासवाणी ।
अर्थ गह्यार्थ जे जे पुराणी ।
बोलीले कवी प्रासाद वाणी ।
तेही अर्थ मी नेणे ॥१॥
आपुलिये आवडीचिये भरी ।
गौरविली म्या हे वैखरी ।
श्रवण करावी हे चतुरी ।
ऐशी नव्हेचि मुग्ध वाणी ॥२॥
परी एक आहे विश्वास थोरु ।
स्वामी तुकया हा सद्गुरु ।
न करील कदाही अव्हेरु ।
भाव माझा जाणोनी ॥३॥
कृष्णचरित्री हे वाग्बाणी ।
वदविली तिहिंचि वर देउनी ।
पुरविली माझी हे आयणी ।
आर्त जाणोनि अंतरीचे ॥४॥
निळा म्हणे कृष्णार्पण ।
होतु कथिले ते कृष्णगुण ।
ऐशी हे प्रार्थना करुन ।
ठेविला मस्तक चरणांवरी ॥५॥
