वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

अग्निसंस्कार देउनी त

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089921 · अभंग क्र. १६६

166.
अग्निसंस्कार देउनी त्यासी ।
संपादिले उत्तर विधीसी ।
मग निजगजरे उग्रसेनासी ।
स्थापिले राज्य सिंहासनी ॥१॥
नवाचि ध्वज नवे छत्र ।
व्दाही फिरविली सर्वत्र ।
साखरा वांटूनिया नगरांत ।
केले दानपात्र परमसुखी ॥२॥
रायाचे पूर्वील जे प्रधान ।
सन्मानिले ते गौरऊन ।
प्रजेसी सिरपाव देऊन ।
अधिकारी जन सुखी केले ॥३॥
यावरी मातापिता बंदिखानी ।
होती त्या बाहेरी काढुनी ।
वादये लावूनी मंगलस्नानी ।
बरव्या प्रकारी पूजिली ॥४॥
वस्त्रे अलंकारे गौरविली ।
निजमंदिराते अणियेली ।
सिबिका यानी बैसविली ।
घोषगजरे मिरवित ॥५॥
तये काळींचा तो आनंद ।
सांगावया मी मतिमंद ।
जेथे परमात्मा गोविंद ।
संतोषवित मातांपिता ॥६॥
निळा म्हणे बोबडया बोली ।
हरिची कीर्ति हे वाखाणिली ।
संती पाहिजे उपसाहिली ।
नेणते लडिवाळ म्हणोनिया ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग