काशीमहिमा - अभंग ३४८
3481.
काशीमहिमा - अभंग ३४८१
धन्य काशीपुरी धन्य काशीपुरी । जेथे वास करी विश्वनाथ ॥१॥
तयाच्या दर्शने प्राणी मुक्त होय । चारी मुक्ती पाया लागताती ॥२॥
भागीरथी स्नान जयालागीं घडे । समूळ हे झडें पाप त्याचे ॥३॥
काळभैरवाचें दर्शन घेईल । तात्काळ जाईल वैकुंठासी ॥४॥
प्रदक्षणा पंचक्रोशीची जो करी । होईल अधिकारी सर्वस्वाचा ॥५॥
धुंडिराजस्वामी दृष्टी जो न्याहाळी । होईल त्या होळी सर्व पापा ॥६॥
तेथे जाउनिया करी अन्नदान । तया नारायण ह्रदयी वसे ॥७॥
एका जनार्दनी नित्य काशीवास । परम सुखास पात्र झालों ॥८॥
