(श्लोकरचनाआहे)
3378.
(श्लोकरचनाआहे)
धना गुंतले चित्त माझे मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारी ।
मरे हिंडता न पुरे यासि काही । मही ठेंगणी परी ते तृप्ती नाही ॥१॥
पाहाता न दिसे शुद्ध निजमती । पुढे पडिलो इंद्रिया थोर घाती ।
जिवा नास त्या संगती दंड बेडी । हरी शीघ्र या दुष्टसंगासि तोडी ॥२॥
असी आणिके काय सांगो अनंता । मोहो पापिणी दुष्टमायाममता ।
क्रोध काम यातना थोर करी । तुजवांचुनी सोडवी कोण हरी ॥३॥
निज देखता निज हे दूरि जाये । नीज आळस दंभ या भीत आहे ।
तया वस्ती देही नको देउ देवा । तुजवांचुनी आणिक नास्ति हेवा ॥४॥
करी घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भक्ती दूरी ।
नको मोकलू दीनबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायि माथा ॥५॥
अर्थ :
हे मुरारी माझे चित्त धनामध्ये गुंतले आहे आणि माझे मन हे दारोदारी मला अन्न पाण्यासाठी हिंडवत आहे. हे मन दाही दिशा हिंडून येते तरी त्याला हिंडण्यास जागा कमीच आहे सगळया भूमंडळाचा जरी राजा झालो तरी मनाला तृप्ती काही होत नाही. पुढे माझ्या बुध्दीकडे मी पाहिले तर बुध्दी देखील शुध्द झालेली मला दिसली नाही आणि इंद्रियाने तर माझा मोठा घात मांडला आहे. हे हरी अशा या दुष्टांची संगती मला होत आहे व त्यामुळे मला दु:ख होऊन जन्ममरणाच्या बेडीत गुंतावे लागत आहे त्यामुळे यांच्यापासून माझी संगती लवकरात लवकर हे हरी तू तोङ हे अनंता असे माझ्यामध्ये कितीतरी दुर्गुण आहेत ते तुला काय म्हणून सांगू मोह, ममता, पाप हे तर फार दुष्ट आहेत. हे हरी काम क्रोध हे तर मला खूप मोठी यातना देतात दु:ख देतात मग दु:खातून तुझ्यावाचून मला दुसरा कोण सोडवणार आहे ? देवा तुझ्या नीजस्वर
