(श्लोकरचनाआहे)
3379.
(श्लोकरचनाआहे)
पैल सांवळे तेज पुंजाळ कैसे । सिरी तुर्बीली साजिरी मोरवीसे ।
हरे त्यासि रे देखता ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥१॥
जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा ।
शोभे मध्यभागी कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठी ॥२॥
असे यादवा श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती तेहतीस कोटि तीन्ही ।
महाकाळ हे कापती दैत्य ज्यासी । पाहा सांवळे रूप हे पापनासी ॥३॥
कसी पाउले साजिरी कुंकुमाची । कसी वीट हे लाधली दैवांची ।
जया चिंतिता अग्नी हा शांति नीवे । धरावा मानसी आपल्या दृढभावे ॥४॥
मुनी देखता मूख हे चित्त माये । देह मांडला भाव हा बापमाय ।
तुक्या लागले मानसी देवपीसे । चित्त चोरटे सांवळे रूप कैसे ॥५॥
अर्थ :
पलीकडे तेज:पुंज सावळे परब्रम्ह कसे दिसते पाहा त्याने आपल्या माथ्यावर मोरपीस लावले आहे. ज्याला पाहिल्यानंतर त्रिविध ताप आणि माया नष्ट होते अशा योगीराज यादवाला भजा. ज्याला पाहून सोळा हजार एकशे आठ सुंदर स्त्रिया व गोकुळातील सुंदर तरुणी लुब्ध झाल्या. कोटयावधी चंद्रकळा असलेली वैजयंती माळ व त्याच्याशीच एकरुप झालेली ती वैजयंती माळ त्याच्या गळयामध्ये अति शोभून दिसत आहे. असा हा चक्रपाणी सर्व यादवांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याला तेहतीस देव आणि त्रिभुवन वंदन करतात. महाकाळ व महादैत्य ज्याचे नांव ऐकताच थरथर कापतात असे हे सावळे रुप पापनाश करते ते पाहा. अशी ही देवाची कुंकूमासारखी साजिरे पाऊले आहेत व ते पाऊले ज्या वीटेला लागली आहेत ती वीट किती दैववान आहे किती भाग्यवान आहे. ज्याचे चिंतन केले असता अग्नी शांत होतो अशा ह
