वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(श्लोक रचना आहे)

🙏 3. संत तुकाराम · ABH-080852 · अभंग क्र. ३३७७

3377.
(श्लोक रचना आहे)
उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे ।
पळे पाप महा सुटे काप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥१॥
गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनी अमृत सर्वसुख ।
मुनिलागे बहु गोड चित्ती । देहभावना तुटलियासि खंती ॥२॥
ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना ते द्यावयासी उदार ।
सिद्धी वोळगती जया सर्वठायी । तुझे नाम हे चांगले गे विठाई ॥३॥
असे उघडा हा विटेवरी उभा । कटसूत्र हे धरुनि भक्तीलोभा ।
पुढे वाट दावी भवसागराची । विठो माउली सिद्ध हे साधकांची ॥४॥
करा वेग हा तो धरा पंथ आधी । जया पार नाही सुखा ते च साधी ।
म्हणे तुका पंढरीस सर्व आले । असे विश्व हे जीवने त्याचि ज्याले ॥५॥

अर्थ :
हा देव भिवरेच्या तीरी उभा आहे आणि त्याच्यासमोर दक्षिणेकडे मुख करुन चंद्रभागा वाहात आहे. आणि भक्त हे नामवीर आहेत ते हरीच्या नामाची गर्जना जयघोष कशा प्रकारे करतात ते ऐका ती गर्जना ऐकून महापापाला मोठया प्रमाणात थरकाप सुटतो व ते पळतच सुटते. हा देव गुणगंभीर, धैर्यवान व हास्यमुख आहे तो आपल्या अमृतवाणीने सर्वांना सर्वकाळ सुख होईल असेच अमृतवचन आपल्या मुखाने वदत आहे. देवाचे ध्यान चित्तामध्ये करत असताना मुनी लोकांना अतिशय गोड वाटते आणि त्याचे ध्यान करता करता देहभाव नाहीसा झाला तरी या गोष्टीचे भान त्यांना राहात नाही. देवाने आपला असा अप्रतिम थोर ठसा या भुमंडळावर घातला आहे की त्याच्यासारखा इच्छा देणारा उदार दाता दुसरा कोणीही येथे नाही. सर्व रिध्दी सिध्दी तुझी सेवा करतात हे माझी विठाई तुझे नाम फार चांगले आहे. भक्तांच्या लोभामुळे हा देव हातात कटिसूत्र धर

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग