बुध्दीचा पालट धरा रे
15.
बुध्दीचा पालट धरा रे कांही । मागुता हा नाही मनुष्यदेह ॥१॥
आपुल्या हिताचे न होती सायास । गृहृदारा आस धनवित्त ॥२॥
अवचित निधान लागले हे हाती । भोगावी विपत्ति गर्भवास ॥३॥
यावे जा पुढे ऐसेंचि कारण । भोगावे पतन नरकवास ॥४॥
तुका म्हणे धरी आठव या देही । नाही तरी कांही बरे नव्हे ॥५॥
