वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 241. महारीण ३९०० ते ३९०९

जोहार मायबाप जोहार ध

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090320 · अभंग क्र. ३९०६

3906.
जोहार मायबाप जोहार धनी । मीनिराकाराची महारिणी । माझ्या धन्यासी निद्रालागली म्हणोनी । संतसभेसी आले की जीमायबाप ॥१॥ माझे धनी एकुलते एक होते । तंव त्याशी करमत नव्हते । मग मी येऊनिया तेथे । उभी ठाकली की० ॥२॥ मग म्या येऊनियांकाय केले । धन्यास थापटून निजविलें । एवढेंजगडंबर उभे केले । परि सत्ता त्याचीच की० ॥३॥ ते मज मागे टाकुनी । धन्याकडे जाय मोहोरुनी । परि मी टांगेसी धरुनी । ओढोनी आणिले की० ॥४॥ ओढोनि आणिले कोण कोण सबळ । त्यांचीनावें तुम्ही ऐका सकळ । विश्वामित्रासारखे ढिसाळ । ओढोनि आणिले की० ॥५॥ सर्वांमाजी ब्रह्माप्रौढ । तेणे मांडिली मज सर्व होड । त्यावरघालोनि कन्येचे लिगाड । तो पस्तावी पाडिलाकी० ॥६॥ ऋषिमाजी पराशर । तो शास्त्री पुराणीमज निर्भत्सी फार । परि दिवसाच करूनि अंध:कार । ढीवरेसी स्तविला की० ॥७॥ देवऋषिमाजी नारदु॥तो मशीं कधीच नव्हता मरदु । त्याचा द्वारकेमध्येउतरविला मदु । साठ पोरें व्याला की० ॥८॥ वायुसुत हनुमान । तो मजशी करी बहुत गुमान । परि मकरध्वजाचे वेळी दांत विचकुन । उभाठाकला की० ॥९॥ म्या छळिले व्यासाचें शुकदेवपोर । त्याने माझी निर्भर्त्सना केली फार । त्यानेकाढोनि पायींची पैजार । मज तोंडावर मारिलीकी जी मायबाप ॥१०॥ ऐशा ऐशियाच्या केल्यागती । येहवीं वाया गेले नेणो किती । ते नागवेउघडे मज करूनि जिंकू पहाती । त्यांचे तोंडामाती पडो की जी मायबाप ॥११॥ एका जनार्दनींविनवी सर्वांपरी । जो करी पंढरीची वारी । तेथेंबळ न चले निर्धारी । मग येरा झोडपिती की जीमायबाप ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग