पाया पडते महारीण आली
3905.
पाया पडते महारीण आली ॥धृ.॥ ।महारीण गेली वरच्या आळी । महारणीने दिलाद्वारळी । जवळ आली काळाची फेरी ॥१॥ माझेंमहारणीचें ऐका । जागे असा निजू नका । काळकरीतसे लेखा गा ॥२॥ एका जनार्दनी महारीण । करा चंद्रभागें स्नान । घ्यावें पुंडलीक दर्शन । पाहवे विठ्ठलचरण ॥३॥
