स्वामीनी मजवर पूर्ण
3907.
स्वामीनी मजवर पूर्ण कृपा केली । पंच हजार दौलत दिधली । म्हणोनि कायापुरीवस्ती केली । प्रिया राणी भेटली की जीमायबाप ॥१॥ प्रिया महाराणी मीच महारीण । सकळ जमेदार माझे आधीन । माझेपुढे न चलेकवणाचे वचन । धर्म नगरीचे लोक गांजिले कीजी मायबाप ॥२॥ माझेमुळे मसुदी मातले । नाईकवाडेलावालाव करू लागले । शेटे महाजनउन्मत्त जाहले । मेहेत्र्याने जन गांजिले । आत्म्यांतकी जी मायबाप ॥३॥ केसापुरचे लोकसांडिली उरी । बागाईत जिराईत नाही काळीवरी । उरली पांढरी सांगावी की जी मायबाप ॥४॥ नयिनाबाजीची दृष्टी गेली । येता जाता भ्रमिष्ट झाली । भय हाकिमाचे की जी मायबाप ॥५॥ नाकेगांवधाकेच पळाले । तोंडापूर लबलबा करू लागले । बत्तीस शिरांचे लोक पळाले । कसाडबाजार झालाकी जी मायबाप ॥६॥ मग बहु बळ हातगांवींचे । पाठ पोट उदरा गतींचें । मग तेथे खाणे दिजेदिवाळ हाकिमाचें । निर्धूपाहे की जी मायबाप ॥७॥ शिष्टणापूरचे लोक फळफळां मुतूं लागले॥मुर्चुदाबादेचें सुख सांडले । अखंड खिडकी मोकळी । पडली उठू पळू लागले । धीर धरवेना की जीमायबाप ॥८॥ मांडवगड चढावयाची शक्ति राहिली । ढोंगळापुरची मेटें बसलीं । चरण गांवींची चालराहिली की जी मायबाप ॥९॥ आता दया करीगुरुराया । एका जनार्दनी लागे पाया । पतनाजातीललया । तुझे कृपेंकरून की जी मायबाप ॥१०॥
