संतचरणरज वंदुनीं तत्
1497.
संतचरणरज वंदुनीं तत्त्वता । सायुज्य भक्ति माथा पाय देऊं ॥१॥
थोरीव थोरीव संतांची थोरीव । आणिक वैभव कांही नेणे ॥२॥
संतापरतें दैवत नाही जया चित्ती । तोचि एकपुर्णस्थिति ब्रह्माज्ञानी ॥३॥
संत तोचि देव जयांची वासना । एका जनार्दनी भावना नाही दुजीं ॥४॥
