वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 179. गुरुची स्तुती

पाषाणाचा देव बोलेचि

🙏 4. संत नामदेव · ABH-082358 · अभंग क्र. १४०१

1401.
पाषाणाचा देव बोलेचि ना कधी | हरि भवव्याधि केंवि घडे ॥१॥
दगडाची मूर्ति मानिला ईश्वर| परि तो साचार देव भिन्न ॥२॥
दगडाचा देव इच्छा पुरवीत | तरि का भंगत आघाताने ॥३॥
पाषाण देवाची करिती जे भक्ति | सर्वस्वा मुकती मूढपणे ॥४॥
प्रस्तराचा देव बोलत भक्तांते | सांगते ऐकते मूर्ख दोघे ॥५॥
ऐशांचे माहात्म्य जे का वर्णिताती | आणि म्हणविती तेणे भक्त ॥६॥
परंतु ते नर पामर जाणावे | त्यांचे नायकावे बोल कानी ॥७॥
धोंडा घडोनिया देव त्याचा केला | आदरे पूजिला वर्षे बहु ॥८॥
तरी तो उतराई होय केव्हा काई | बरवे हृदयी विचारा है ॥९॥
धोंडापाण्याविण नाही देव कोठे | होता सान मोठे तीर्थ क्षेत्र ॥१०॥
बाराशीचे गांवी जाहला उपदेश | देवाविण ओस स्थळ नाही ॥ | ११ ॥
तो देव नामया हृदयी दाविला | खेचराने केला उपकारू हा ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग