नाचू कीर्तनाचे रंगी
1402.
नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीपलावू जगी ॥ १ ॥
सर्व सांडुनी माझाई । वाचेविठ्ठल रखुमाई ॥ २ ॥
परेहून परते घर । तेथेंराहू निरंतर ॥ ३ ॥
सर्वांचे जे अधिष्ठान । तोंचिमाझे रूप पूर्ण ॥ ४ ॥
अवघी सत्ता आली हाता ।नामयाचा खेचरी दाता ॥ ५ ॥
