राजाईस तेव्हा म्हणतस
3622.
राजाईस तेव्हा म्हणतसे नामा । दैन्यकाळ आम्हा नाही नाही ॥१॥
आम्ही हरिदास कुबेर भांडारी । संपदा ती थोरी घरी वसे ॥२॥
कृपावंतें मज नाही उपेक्षिले । आम्ही का वहिले दैन्यवाणें ॥३॥
एका जनार्दनी बोलोनिया मात । गेला राउळांत तेव्हा नामा ॥४॥
