वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

पंढरीमाहात्म्य

🙏 4. संत नामदेव · ABH-083010 · अभंग क्र. ३९३

393.
पंढरीमाहात्म्य

सहस्त्रअठ्यांशी ऋषि|स्कंद उपदेशी तयांसी|तिही एक पुसिली पुसी|ते तयासी अकळ॥१॥
आता जाऊ कैलासा|सकळ पुसू त्या महेशा|मग निघाले आकाशा|पितृदेशा पातले॥२॥
बरे होऊनिया सावध| ऐका भक्तीचा संवाद|विनविता जाला स्कंद|तो अनुवाद शंभूचा॥३॥
स्कंदे विनविला त्रिपुरारी|सहित वामभागी गौरी|स्तुति स्तवने केली भारी|ह्रदासनी नमियेला॥४॥
मग निघाला लोटांगणीं|म्हणे त्राहे त्राहे शूळपाणि|करे उचलिला धांवोनि| मग आसनी बैसविला॥५॥
ऋषींसि आसने देऊनि वेगां|जवळी बैसविले पै गा| ते म्हणती झडकरी सांगा|जे वेदशास्त्रांसि प्रिय॥६॥
तव स्कंद म्हणे ताता|ऋषिंनी पुसिली जे वार्ता| ते अखळ मिझिया चित्ता| वेदशास्त्रविरहित॥७॥
बरवी तीर्थे पुण्यरासी| माहात्म्ये सांगत होतो त्यासी|परी तीर्थ क्षेत्र भक्त देवांसी| नाही चहूंसी एक मेळा॥८॥
जे जे क्षेत्री करिता विचार| ते ते ठायी तेंचि थोर|परि तयामाजी असे सार| जैन माहेर सकळिकां॥९॥
पाप घडे जे जे मेदिनीं| तयांसी ते तीर्थ करी धुणी|तीर्था वर्णी शूळपाणि|सांगा हानि जे करी॥१०॥
जाळिती पातकांचिया कोडी| ऐसी तीर्थे आहेत गाढी|तया सकळिका तीर्था आहे खोडी| ते मी उघडी सांगेन ॥११॥
हिमकाळी कीजे स्नान| हेचि प्रयागासी न्यून |काशी इच्छी जो मरण | थोर निर्वाण पाविजे ॥१२॥
पितृस्मरण आचमन| करोनि देईजे पिंडदान|तेणे पूर्वज होती पावन| हेंचि न्यून गयेसी ॥१३॥
गाढे कुरुक्षेत्र जाण| तेथे किजे हिरण्यदान |केदारीचे उदकपान| करी पीडन देहासी ॥१४॥
उपमाद्वारकेहुनी| अरुच गोमतीचे पाणी|सहा मास सेविल्यावांचुनी| नव्हे दाटनी चक्राशी ॥१५॥
गंगा बारा वरुषावरी| सकळिकामध्ये गोदावरी |सिंहस्थी महिमा थोरी| है न्यून भारी तयासी ॥१६॥|
अयोध्या माया मथुरा| कांची आवंतिका करवीरा|लोण्हार हाटकेश्वर तुंगभद्रा | आणि पुष्करा कावेरी ॥१७॥
कलिमाजी वैकुंठ साक्षात| गाढ़े क्षेत्र जगन्नाथ |त्या देवासी नाही पायहात| उणीव बहुत तयासी ॥१८॥
गाढे श्रीशैल्यपर्वत| लक्षावया उदित |तेथे जिवासी करिजे घात | ही उणीब बहुत तयासी ॥११॥
गाढ़े क्षेत्र परियेसा| गोकर्ण सेतुबंधु महेशा |तयासी उणीव ऐसा| जे यमदिशा म्हणताती ॥२०॥
ऐसी तीथे कोटीरासी| परि लांछन आहे सर्वासी|पहिले राहिजे उपवासी| मग डोईसी मुंडन | २१|
सकळ तीर्थांचा पारू| जो गा देखिला सागर|तयासी उणीव आहे थोरु | योग येतो अमावास्ये ॥२२॥
म्हणोनि पुसो आलो तुज| सकळ तीर्थांचे बीज|ते झडकरी सांग मज| देवा तुज जे प्रिय ॥२३॥
ऐसी करोनि विनवणी| मग स्कंद लागला चरणी|येरे उचलिला झडकरुनी| मग शूळपाणि हे बोलिले ॥२४॥
पुत्रा तुवा जे केली विनंति| हेंचि गिरिज़ा पुसत होती|तरी सांगेन तुजप्रती| चित्त देऊनि परियेसी ॥२५॥
महिमा दरुशनाचा पूर्ण | एक लक्ष्मी जाणे खूण |शुक सनकादिक मुनि सज्जन | आणि वैष्णवजन प्रेमळ ॥२६॥
जैसा कृपणाचा ठेवा| तैसे 'आ्त रे माझिया जीवापुत्रा पुसिले तुवा | तरी वृत्तांत बरबा सांगेन ॥२७॥
मी बैसोनिया स्मशानी| जयाचे नाम जपतो ध्यानीं|ते देवत आहे जये स्थानी | चित्त देऊनि परियेसा ॥२८॥
युगा अठ्ठाविसांवरी| आहे पुंडलिकाच्या द्वारीं|विठ्ठल उभा भीमातीरी | विश्व तारी दरुशने ॥२९॥
घेऊनि तरुवरांची दुंथि| देव सेवा जाणवीती|आदिकरोनी पार्वती| आम्हा बस्ति तये ठायीं॥३०॥
तेजे शळाळे वैकुंठ| तयापरी चोखट|पहा पंढरपूर नीट| महिमा अद्भूत तिही लोकी ॥३१॥
जेणे पीडिले तिन्ही लोकां| त्यासि वधावया पावलो देखा|ओढी काढोनी त्र्यंबका| श्रीहरि सखा स्मरला | ३२॥
घात करोनी त्रिपुरा| वधियेले तिन्ही असुरा |तैंचि तीर्थ भिवरा| सचराचरा तारक | ३३॥
प्रतिदिनी मध्यान्हीं| सकळ तीथे 'स्थानी |भिवरे सुस्नात होऊनि | विठ्ठलचरणी लागती ॥३४॥
तये क्षेत्री पाप घडे| ऐसे बोलता जिव्हा झडे|काय तुज सांगू पुढे| ब्रह्म उघडे असे जेथे | ३५ ॥
लोहो लागलिया परीसे| सोने जाले एक सरिसें|आता पालटेल कैसे भलतें| तैसे जरी जाले ॥३६॥
एक वेळ पंढरीये जाऊन| मग भलतिये ठायी राहो का जन|तो राहे वैकुंठींच जाण| कर्महीन जरी जाला ॥३७॥
ऐसे ऐकोनी उत्तर| स्कंद हरुपे निर्भर|आदि करोनी ऋषीश्वर | पंढरपूर ठाकिती ॥३८॥
विष्णुदास नामा म्हणे | एक वेळ पंढरीये जाणें|विठ्ठल धन्यावरी पाहणे | नाही येणे संसारा ॥३९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग