चिंतितो मी चिंतनी ।
564.
चिंतितो मी चिंतनी ।
रुप तुमचे अनुदिनी ॥१॥
कराल कृपा म्हणोनिया ।
विठो पंढरीच्या राया ॥२॥
मागे उध्दरिले बहुत ।
लहान थोरले पतीत ॥३॥
नेले वैकुंठासी ।
महापापीमहा दोषी ॥४॥
ऐसी ऐकोनिया मात ।
चरणी विगुंतला हेत ॥५॥
निळा म्हणे याचि लागी ।
घेतो लाहो करितो सलगी ॥६॥
